प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था

आमच्याबद्दल

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणारी विश्वासू संस्था

प्रकाश आवाडे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इचलकरंजी (नोंदणी क्र. KPR/HLE/HSG/TC/127/2026) ही संस्था म्हाडा (MHADA) व प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत "प्रकाश आवाडे नगर" हा भव्य घरकुल प्रकल्प साकारत आहे. कामगार, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि नोकरदारांना परवडणाऱ्या दरात ३७२.११ चौ. फूट कार्पेट एरियाचे १ BHK घर देणे हे आमचे ध्येय आहे.

या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक मा. श्री. प्रकाश आवाडे (माजी वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र) आहेत. शरद इन्स्टिट्यूट मागे, टाकवडे रोड, इचलकरंजी येथील ५ एकर हरित परिसरात हा प्रकल्प उभा राहत आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत सुलभ गृहकर्ज आणि पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी) मिळवून देण्यासाठी आम्ही सभासदांना मार्गदर्शन करतो.

  • ५ एकर हरित परिसरात सात मजली इमारती, लिफ्ट व स्वतंत्र पार्किंगसह
  • कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत सुलभ गृहकर्ज सुविधा
  • पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी)

आमची टीम

संस्थेचे संचालक मंडळ

श्री. प्रकाश कल्लाप्पा आवाडे

चेअरमन

श्री. राजेंद्र शंकर आरेकर

व्हा. चेअरमन

श्री. श्रीकांत महादेव टेके

सेक्रेटरी

श्री. संजय आनंदराव सातपुते

संचालक

श्री. कपिल शशिकांत शेटके

संचालक

श्री. केशव महादेव पेटकर

संचालक

सौ. सुदर्शना मारुती पाटील

संचालक

श्री. रामा निलाप्पा पाटील

संचालक

सौ. उज्वला सदाशिव कित्तुरे

संचालक

श्री. शिवाशिष महेंद्र पाटील

संचालक

सौ. दिपाली कपिल लोटे

संचालक

ध्येय / दृष्टी

आपले स्वप्न... आमचे ध्येय!

आमचे ध्येय

कामगार, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि नोकरदार अशा सर्वसामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. म्हाडा (MHADA) व प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत सुलभ गृहकर्ज आणि शासकीय अनुदानाच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

आमची दृष्टी

सुरक्षित, हरित आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी वसाहत उभारणे, जिथे प्रत्येक कुटुंब आनंदाने आणि आपुलकीने एकत्र राहील, हीच आमची दृष्टी आहे. प्रकाश आवाडे नगर हा केवळ घरांचा प्रकल्प नसून सहकाराच्या बळावर उभी राहणारी एक आदर्श वसाहत बनवण्याचा आमचा संकल्प आहे.

आमचे वैशिष्ट्य

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर, परवडणाऱ्या दरात

प्रकाश आवाडे नगर घरकुल प्रकल्प

०१

परवडणारी घरकुल योजना

कामगार, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि नोकरदारांसाठी ३७२.११ चौ. फूट कार्पेट एरियाचे १ BHK घर. फक्त ₹२ लाख डाऊन पेमेंटमध्ये बुकिंग करता येते.

०२

सहकारी बँकेचे कर्ज व सबसिडी

कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेमार्फत ८ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. पात्र लाभार्थ्यांना PMAY 2.0 (शहरी) अंतर्गत शासकीय अनुदान (सबसिडी) लागू आहे.

०३

सुरक्षित व आधुनिक वसाहत

५ एकर हरित परिसरात सात मजली इमारती, लिफ्ट, स्वतंत्र पार्किंग, गार्डन, लहान मुलांसाठी प्ले एरिया, सोलर पॉवर आणि २४×७ सुरक्षा व्यवस्था असलेली गेटेड कम्युनिटी.